माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी मोर्बा उपसरपंच इकबाल हर्णेकर, अल्ताफ धनसे, फाऊंडेशनचे सचिव मौलाना अब्दुल सलाम राऊत, कार्यकारिणी सदस्य जहीर धनसे, निजामुद्दीन राऊत, पोलीस पाटील उस्मान धनसे, बशिर किरकिरे, इम्रान राऊत आदी उपस्थित होते.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …