Breaking News

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख यांनी त्यांच्या पवीत्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. शिक्षण, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. स्वर्गीय भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. त्यांची मंगळवारी पुण्यातीथी होती. यानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना अभिवादन केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रतनशेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक तेजस कांडपिले, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ज्योत्स्ना ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, माजी सदस्या योगिता भगत, जितेंद्र म्हात्रे, मीन्नाथ फडके, अमृत भगत, श्रीधर भगत, हेमंत ठाकूर, रमेश घरत, गुलाब घरत, श्रीकांत घरत, सुहास मुंबईकर, राजेश खारकर, अनंत ठाकूर, प्रकाश भगत, अजय भगत, संजय भगत, जयवंत देशमुख, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, नंदराज मुंगाजी, माधव पाटील, सी.एल.ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply