Breaking News

महिला सक्षमीकरणासाठी भाजप कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महिलांचे जीवनमान उंचावून त्यांचे सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चा कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी हळदी कुंकू समारंभावेळी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप महिलामोर्चा तालुका व शहर मंडळाच्यावतीने नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 20) हळदी कुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि महिलामोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

या पैठणीच्या खेळामध्ये नवीन पनवेल येथील राणी हजारे या विजयी झाल्या. त्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. या वेळी महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, रुचिता लोंढे, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष स्मिता वाणी, महिला मोर्चा पनवेल शहराध्यक्ष वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, भाजप महिला मोर्चा शहर सरचिटणीस सपना पाटील, ग्रामीण सरचिटणीस प्रतिभा भोईर, वाकडीच्या सरपंच रंजना पाटील, सदस्या अंजली इनामदार, लीना पाटील, सुहासिनी केकाणे, तालुका उपाध्यक्षा समीना साठी, अनुसया घरत, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, सरचिटणीस शिल्पा म्हात्रे, उलवा नोेड महिला मोर्चाध्यक्षा योगीता भगत, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, माजी नगरसेविका प्रमिला मुंबईकर, सिद्धीका पुंजारी, नाझ हाफीज्, आदिती मराठे, मनिषा चिल्ले, ज्योती देशमाने, खांदा कॉलनी अध्यक्षा राखी पिंपळे, मयुरी उन्नडकर, जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, माजी नगरसेविका संगीता कांडपाळ, स्वाती कोळी, प्रियंका शिंदे, सुनिता महापे, आशा मुंडे, शकुंतला पगडे, प्रेमा भोपी, ज्योती देशमाने, निता मंजुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

पनवेल महापलिका महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यानुसार महिलांना विविध प्रशिक्षणे मोफत देणार असून, महिला ब बालकल्याण विभागात जाऊन महिलांनी फॉर्म भरण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेमार्फत महिलांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यावेळी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply