आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेत घोटाळा करून ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे हडप करणार्या राजाचे राजापण सध्या तळोजा जेलमध्ये सुरू आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईतील शेकाप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली.
शेतकरी कामगार पक्षाला जोरदार झटका देत आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल यांनी त्यांच्या समर्थकांसह गुरुवारी (दि. 17) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले तसेच तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो येणार्या काळात किती समाधानकारक आहे असे काम भाजपचे पदाधिकारी तुमच्या साथीने करून दाखवतील अशी खात्री दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेकापचे आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल तसेच अनिकेत पाटील, प्रशांत मोकल, मुकेश मोकल, गिरीश मोकल, जगदीश मोकल, रूपेश म्हात्रे, रूपेश मोकल, गजानन रसाळ, अतिश शेळके, आर्यत मोकल, हर्ष कनोजिया अभिमन्यू भंडारी, विनोद म्हात्रे, धीरज जसवाल, प्रकाश खोलपते, माणिकचंद, सतीश सोनवणे, जहेर खान, सुरज राजपूत, मोहम्मद बशीर, सुभाष पटेल, धरवेन्द्रकुमार पटवा, सूर्यनारायण, रमेश सिंह, संतलाल पासी, साहिल भंडारी, मोहम्मद तोफिक, पियुष भंडारी, सुशांत शेळके, सुरज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
खांदा कॉलनीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके, भाई रमा पाटील, जगदीश शेळके, बाळाराम पाटील, पद्माकर शेळके, श्रीचन भंडारी, राजेश काकडे, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, निलेश पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, विवेक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तेजस म्हात्रे यांच्यासह पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.