Breaking News

शिरढोणमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार

माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख भाजपमध्ये; आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व व विधायक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात असणार्‍या शिरढोण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांनी भाजपपध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.
शिरढोण येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, युवा नेते प्रितेश मुकादम, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, जगदिश चौधरी, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विजय भोपी, रोशन घरत, कृष्णा वाजेकर, अनिल टकले, राजेंद्र भोपी, जगदिश ढवळे, भगवान मुकादम, अनंत भोपी, युवा नेते अभिजीत मुकादम, राम चौधरी, नारायण चौधरी, टकल्या चौधरी, गनानन घरत, राम वाजेकर, विकास चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी माजी उपसरपंच गजानन घरत, रेश्मा राम वाजेकर, माजी शाखाप्रमुख राम वाजेकर, उपशाखाप्रमुख अजय वाजेकर तसेच निशा शाम वाजेकर, अनिल वाजेकर, एकनाथ टकले, कांचन टकले, अक्षय वाजेकर, योगेश घरत, कृपाण म्हात्रे, अनिकेत वाजेकर, जयेश वाजेकर, प्रज्ञेश वाजेकर, महेश चौधरी, चेतन चौधरी, स्वागत टकले, नितीन वाजेकर, स्वप्नील टकले, बाळाराम म्हात्रे, अनिकेत बाळा म्हात्रे आदी कार्यकर्त्यांनी विकासाला साथ देण्याचा निर्धार करीत भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply