Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पनवेलचा वेगवान विकास -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचा वेगवान विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे होत आहे. जे पूर्वीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी लोकांमध्ये भांडण लावण्याचे काम केले, भ्रष्टाचार करून गोरगरीबांचे पैसे हडप केले. अशांना जेलमध्ये टाकण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याचे सांगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागझरीमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेवेळी विरोधकांवर हल्लाबोल केला.
श्री कृष्ण स्पोर्ट्सच्या वतीने महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 ते 27 ऑक्टोबरदरम्यान नागझरी येथील मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेला पनवेल महापालिकचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) भेट देत शुभेच्छा दिल्या. त्यांचे आयोजकांकडून स्वागत करण्यात आले.
या वेळी भाजप नेते तथा आयोजक महेश पाटील, भारत म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, भारत म्हात्रे, सुनील म्हात्रे, जयवंत म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, रूपेश म्हात्रे, शांताराम म्हात्रे, नरेश म्हात्रे, ऐकनाथ म्हात्रे, कुणाल म्हात्रे, साहिल म्हात्रे, अमोल म्हात्रे, मनोज म्हात्रे, अक्षय म्हात्रे, यश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे झपाट्याने विकास होत आहे. अशाच विकासकामांची गंगा मतदारसंघात वाहत राहावी यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply