Breaking News

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पत्र सुपूर्द

पनवेल : रामप्रहर वृत्त
पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडेे शुक्रवारी (दि. 25) सुपूर्द केले.
विधनासभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे पनवेल मतदारसंघात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीतील घटक पक्ष असून पनवेल मतदारसंघातील पीआरपीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे काम करणार असल्याचे या पाठिंबापत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्र देताना पीआरपीचे तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव हेही उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply