जेएनपीटी : प्रतिनिधी
सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या रविवारी (दि. 24) पार पडणार आहे. निवडणुकीला ताकदीने सामोर्या जाणार्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 22) सोनारी गावात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांचा तसेच सदस्यपदाच्या नऊ
उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा दावा सोनारी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कडू यांनी केला आहे.
सोनारी गावातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी माजी सरपंच महेश कडू यांनी ग्रामस्थांकडे 10 लाख रुपयांची मदत निस्वार्थी भावनेतून देऊ केली, तसेच गावातील मुला-मुलींना इंग्रजी भाषेचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नियुक्ती करून त्या शिक्षिकेला स्वत:च्या खिशातून पगार देण्याचे काम महेश कडू यांनी केले. अशा दातृत्वाची भावना अंगी बाळगणार्या कडू यांची पत्नी पूनम कडू या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने होऊ घातलेल्या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सरपंचपदासाठी भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून सामोर्या जात आहेत.
नऊ सदस्यपदांसाठी युतीचे उमेदवार भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ग्रामस्थ आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कै. सुरेशदादा कडू यांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 1मधून अश्विनी हरिश्चंद्र कडू, हेमांगी गणेश म्हात्रे, जगदीश मोरेश्वर म्हात्रे; प्रभाग क्रमांक 2मधून जगदीश कान्हा म्हात्रे, रेश्मा दीपक कडू, मेघश्याम नारायण कडू; तर प्रभाग क्रमांक 3मधून रेश्मा नंदकुमार कडू, ममता सुरेश कडू, संदीप केशव कडू रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती.
या प्रचार रॅलीत सोनारी गावातील ज्येष्ठ नागरिक कृष्णा कडू, नरेश कडू, हरिश्चंद्र कडू, कमळाकर कडू, रमेश म्हात्रे, काशिनाथ तांडेल, ज्ञानेश्वर कडू, प्रदीप कडू, सुरेश कडू, तुळशीराम कडू, अनंत कडू, प्रकाश कडू, परशुराम कडू, रवींद्र कडू, हसुराम तांडेल, बाळकृष्ण नाईक, नारायण कडू, शशिकांत कडू, अमोल तांडेल, जॉनी तांडेल, हर्षल तांडेल, शैलेश तांडेल, दिलीप तांडेल, दिनेश तांडेल, माजी सरपंच महेश कडू, मनीष कडू, नंदकुमार ठाकूर, विजय कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.