Breaking News

पनवेल मनपातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’

पनवेल ः प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने शून्य कचरा मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी एक वाहन तयार करण्यात आले असून, यात जुने कपडे, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यात येणार आहेत. या वाहनाचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 30) उद्घाटन करण्यात आले.
पनवेल महपालिका हद्दीत उत्स्फूर्तपणे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एक वाहन तयार करण्यात आले असून त्यात आपल्या घरातील पडीक पण वापरण्यायोग्य जुने कपडे, भांडी, प्लास्टिक, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक कचरा आदी गोळा करण्यात येणार आहे, जेणेकरून या वस्तू कचर्‍यात न जाता त्यांचा योग्य तो पुर्नवापर, पुर्नचक्रीकरण करता येऊ शकते. तसेच पुर्नवापर करण्यायोग्य वस्तू गरजूंना दान करण्यात येणार आहेत.
या मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेल्या वाहनाच्या उद्घाटनावेळी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव तसेच कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या संदर्भात महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिक माहिती दिली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply