महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी (दि. 26) रात्री भरधाव कार चालक रस्त्यालगत असलेल्या एका झाडावर आपटल्याने कारचे नुकसान झाले. मात्र कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. बिरवाडीयेथील रुपेश जनार्दन कदम (वय 26) याने मंगळवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास भरधाव कार (एमएच-06, बीएम-4053) चालवत रस्त्यालगत एका झाडाला ठोकर दिली. या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.