Friday , March 24 2023
Breaking News

ज्येष्ठांतर्फे शिवजयंती, वर्धापन दिन साजरा

पनवेल : वार्ताहर

भारतीय धनगर परिषद व अमोल ज्येष्ठ नागरिक सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील अमोल ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात शिवजयंती व विरंगुळा केंद्राचा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दलित-मित्र श्रीरंग वळकुंडे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे केंद्र सतत प्रयत्न करीत असून, यापुढे ते या विभागातील ज्येष्ठांचा आधारस्तंभ होईल यात शंका नाही. शिवाजी सिनलकर, पोपटराव पाटील, चिमाजी ठोंबरे, पांडुरंग जगदाळे यांनीही विचार मांडले. राजकुमार कदम, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्राचे सचिव नंदकुमार बंडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply