
पनवेल ः हैदराबाद येथे स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या बॅडमिंटन कोचचा सहा आठवड्यांचा कोर्स योगेश पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच हैदराबादच्या बॅचमध्ये योगेश पाटील टॉपर आले आहेत. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी रवींद्र भगत उपस्थित होते.