Breaking News

खारघरच्या पोलिसाला कोरोना

रायगडात तीन नवे रुग्ण; दोन पनवेलमधील, तर एक पोलादपूरचा; जिल्ह्यात एकूण 57 कोरोनाग्रस्त

पनवेल, पोलादपूर : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे एकूण तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पनवेल तालुक्यातील दोन, तर पोलादपूरमधील एकाचा समावेश आहे. पनवेलमधील दोन रुग्णांपैकी एक पोलीस आहे. या नव्या तीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 57 झाला आहे.

पनवेल तालुक्यात महापालिका क्षेत्रात खारघर येथील पोलीस कर्मचारी आणि कामोठे येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. खारघर येथील रुग्ण हा पोलीस कर्मचारी असून तो रोज खारघर ते वांद्रे (मुंबई) असा प्रवास कामानिमित्त करीत होता. कामोठे येथील 59 वर्षांची व्यक्ती अगोदरपासून मूत्रविकाराचा व रक्तदाबाचा त्रास असणारी आहे. याआधी सोमवारी खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि तेथे उपचारासाठी आलेल्या कळंबोलीतील एक व्यक्ती आणि खारघरमधील अन्य एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पोलादपूर शहरातील वृद्ध महिलेचा तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर 24 तासांत मृत्यू झाला होता. तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, मुलगा व सून यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कळंबोलीतील सहा संशयित रुग्णालयात

कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशातच कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या कळंबोली गावातील सहा जणांना संशयित म्हणून मंगळवारी (दि. 21) ताब्यात घेण्यात आले. त्यांना रोडपाली येथील कोविड-19 रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे कळंबोलीत भीतीचे वातावरण आहे.

कळंबोलीतील सहा जणांत ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे.

उरण : मास्क न लावता शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरणार्‍या तरुणांना पोलिसांनी बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली. (छाया : जीवन केणी)

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply