दुबई : वृत्तसंस्था
क्रिकेट वर्ल्ड कप 2019ला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षिसे जाहीर केली आहेत. आयसीसीने ठरवलेल्या बक्षिसामुळे वर्ल्ड कप जिंकणारी आणि उपविजेता टीम मालामाल होणार आहे.
आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या टीमला 40 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. 40 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास 28 कोटी रुपये. त्यामुळे विजेती टीम चांगलीच मालामाल होणार आहे, तसेच उपविजेत्या टीमसाठी आयसीसीकडून आठ लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम ठरली आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपमधील आपली पहिली मॅच 5 जून रोजी खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. एकूण 45 दिवस वर्ल्डकप रंगणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतीलअंतिम सामना हा क्रिकेटची पंढरी समजली जाणार्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना 14 जुलै रोजी खेळला जाणार आहे.