माणगाव : प्रतिनिधी
भिरा येथील देवकुंड धबधबा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात देवकुंडात पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी देवकुंड धबधबा परिसरात 29 जून ते 31 ऑक्टोंबर 2019पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे वर्षा सहलीसाठी येणार्या पर्यटकांना आता याठिकाणी मौजमजा करता येणार नाही. यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.