Breaking News

टँकर चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी

परिसरातील सारसन येथील अलाना ऑइल कंपनीत माल घेण्यासाठी टँकर घेऊन आलेल्या चालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. राजबहादूर यादव (वय 48, रा. कळवा खारेगाव मूळ रा. उत्तर प्रदेश) सारसन (ता. खालापूर) येथील फ्रीगोरीफीका अलाना प्रा. लि. या तेल उत्पादन करणार्‍या कारखान्यात गुरुवारी टँकर घेऊन आले होते. टँकर कारखान्यासमोर आल्यावर प्रकृती बिघडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच ठिकाणी खाजगी रुग्णालयात तात्पुरता उपचारही घेतला. मात्र संध्याकाळी अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांनी क्लिनरला आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास सांगतले. या दरम्यान, हृदयविकारचा तीव्र झटका येऊन त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. पोलीस पंचनाम्यानंतर त्यांचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply