Tuesday , March 28 2023
Breaking News

‘रायगडचा विकास भाजप करणार’

पत्रकार परिषदेत कृष्णा कोबनाक यांची माहिती; भाजपची सदस्य नोंदणी सुरू

रोहे ः प्रतिनिधी

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पुर्ण होईल. रोहा-तळा-साई मार्गाचे चौपदरीकरण आणि माणगाव-दिघी-तळा रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. सामान्य जनतेसाठी भाजप सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकास कामे झाली आहेत. भविष्यातही रायगड जिल्ह्याचा विकास भाजपच करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी गुरुवारी (दि. 4) रोहा येथे दिली. येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच रोहा मंडळ अध्यक्ष सोपन जांबेकर व वसंत शेडगे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात विशेषत: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग अशी अनेक विकास कामे आमच्या सरकारने केली असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला. देशात पुन्हा एकदा आमचे सरकार आले आहे. राज्यातही भाजप सेना युतीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास कृष्णा कोबनाक यांनी व्यक्त केला. भाजपने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी सुरू केली आहे, पक्ष बांधणीकडे लक्ष दिले आहे, याशिवाय सामन्य जनतेसाठी आणलेल्या योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे काम चालू आहे, अशी माहिती कृष्णा कोबनाक यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply