Breaking News

कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली

कोल्हापूर : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून एकेरी वाहतूक चालू होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply