नवी दिल्ली : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरातून दीड कोटींहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. केंद्राच्या आवाहनाला लोकांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, देशातील जनतेने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या अभियानानुसार, जगभरातील भारतीयांनी ‘जन गण मन’ गातानाचे व्हिडीओ अपलोड केले आहेत. हे भारतीयांमधील एकता, क्षमता आणि सौहार्दाचे प्रतीक ठरले आहे. यावर भाष्य करताना सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले की, राष्ट्रगीत हे आपल्या अभिमानाचे प्रतिक आहे. या कार्यक्रमातून भारतीयांच्या एकजुटीचा संपूर्ण जगाला संदेश गेला आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …