Breaking News

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; म्हसळ्यात कर्मचार्यांची कमतरता

म्हसळा : प्रतिनिधी – वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने म्हसळा शहर व ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

म्हसळा तालुक्यात सुमारे 19 हजार 256 ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती, व्यापारी, औद्योगिक वापराच्या विज ग्राहकांचा समावेश आहे. पावसाळा पुर्व कामासाठी मे महिन्यांत सातत्याने विज पुरवठा खंडित होत होता, तर आता अति पाऊस, वादळी वारे व विजांचा कडकडाटामुळे विज खंडित होण्याचे प्रकार सतत होत आहेत. वीज वितरण कंपनीने ग्राहकाना गतीमान सेवा मिळावी म्हणून ग्राहक संख्या व तालुक्याच्या भौगोलीक रचनेप्रमाणे म्हसळा उपविभागात म्हसळा शहर, म्हसळा ग्रामीण, मेंदडी, खामगाव, आंबेत या पाच शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. मात्र प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये 50टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. तालुक्यात सध्या 33कर्मचार्‍यांची कमतरता निर्माण झाली आहे. मेंदडी, खामगाव, आंबेत, म्हसळा ग्रामीण या चारही विभागातील सेक्शन इंजिनीअर मागील वर्षी जून महिन्यामध्ये बदली करुन गेले आहेत.

तालुक्यात अशी आहेत रिक्त पदे

विज वितरण कंपनीच्या म्हसळा तालुक्यातील पाच विभागासाठी प्रत्येक अकरा पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील 50टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहे.

1) मेंदडी विभागात सेक्शम इंजिनियरसह 8 पदे रिक्त

2) खामगाव विभागात सेक्शन इंजिनियरसह 8 पदे रिक्त

3) आंबेत विभागात सेक्शन इंजिनियरसह 5 पदे रिक्त

4) म्हसळा ग्रामीण विभागात सेक्शन इंजिनियरसह 7 पदे रिक्त

5) म्हसळा शहर विभागात एक असीस्टंट इंजिनियरसह 5 पदे रिक्त

म्हसळा हा डोंगराळ तालुका असल्यामुळे व बहुतांश लाईन वनविभागाच्या जागेतून जात असल्याने खंडित झालेला वीज पुरवठा सुरुळीत करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यासाठी आमचे सर्व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत असतात. रिक्त पदांच्या पूर्ततेकरिता आम्ही सातत्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र पाठवत असतो. -यादव इंगळे, कार्यकारी अभियंता, महावितरण म्हसळा उपविभाग

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply