Thursday , March 23 2023
Breaking News

वर्ल्डकपमधील अपयशाने ख्रिस गेल निराश

लीड्स : वृत्तसंस्था

आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात, तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश झाला आहे.

‘विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे, मात्र अखेरच्या विश्वचषकात छाप न पाडता आल्याचे दु:ख होत आहे. येथे येण्यासाठी पडद्यामागे बर्‍याच गोष्टी घडत गेल्या आणि घडत आहेत. विश्वचषक उंचावला असता, तर अधिक आनंद झाला असता, पण तरीही मी खेळाचा आनंद लुटला. संघातील अनेक

सदस्य युवा खेळाडूंना पाठिंबा देत आहेत ही खूपच चांगली गोष्ट आहे,’ असे 39 वर्षीय गेलने सांगितले.

पुढील महिन्यात होणार्‍या भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे संकेत गेलने गेल्या आठवड्यातच दिले होते. ‘वेस्ट इंडिज क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा हा संघ आहे. शिमरॉन हेटमायर, शाय होप, निकोलस पूरन यांच्यासारखे चांगले खेळाडू विंडीजला मिळाले आहेत. त्याचबरोबर जेसन होल्डरसारखा युवा कर्णधार लाभला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचे भवितव्य उज्ज्वल आहे. शरीरावर अतिरिक्त ताण देण्याची इच्छा नसल्यामुळे ही माझी अखेरची विश्वचषक स्पर्धा असणार आहे, परंतु यापुढेही वेस्ट इंडिज क्रिकेटच्या भल्यासाठी सदैव उपलब्ध असेन’, असे ख्रिस गेलने सांगितले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply