Breaking News

वाशी विभागाची भातखरेदी केंद्राची गरज पूर्ण

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन

पेण : प्रतिनिधी

 दि. महाराष्ट्र स्टेट को. ओ. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथे सुरू करण्यात आलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. 9) आमदार रविशेठ पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे वाशी विभागातील भात खरेदी केंद्राची गरज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन आमदार पाटील यांनी केले. पेण तालुक्यातील बोर्झे येथील काळभैरव नावीन्यपूर्ण सर्व सेवा सहकारी संस्थेने शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेअंतर्गत दि. महाराष्ट्र स्टेट को. ओ. मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या वतीने वाशी विभाग सहकारी भात गिरणी येथे आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्याचे गुरुवारी आमदार रविशेठ पाटील यांनी उद्घाटन केले. या वेळी त्यांनी भाताचा हमीभाव 1815 रुपये सर्वसाधारण प्रतिक्विंटल व अ प्रतीस 1835 प्रतिक्विंटल असे असणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकर्‍यांना यापुढेही भातशेतीसाठी हेटवणे धरणाचे पाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच वाशी भागातील पाणीप्रश्न जवळजवळ निकाली काढला असल्याचे ते म्हणाले.  या कार्यक्रमास राजिपचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, वाशी भात गिरणीचे अध्यक्ष शांताराम ठाकूर, पेण तालुका भाजप अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अनंत पाटील, विठोबा पाटील, सरपंच पूजा पाटील, भास्कर पाटील, कृष्णा वर्तक, वंदना म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply