Tuesday , March 21 2023
Breaking News

‘हिटमॅन’ बनला ‘बिग बॉस’

लीड्स : वृत्तसंस्था

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धेत

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक ठोकले. या स्पर्धेतील रोहितचे हे पाचवे शतक ठरले. यासोबतच एका विश्वचषक स्पर्धेत शतकांचा ‘पंच’ देणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान रोहितने मिळविला आहे, तर  विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सहा शतके करून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

याआधीच्या सामन्यात रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकून श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या एकाच विश्वचषकातील चार शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. शनिवारी श्रीलंकेविरुद्धच 92 चेंडूंत दणकेबाज शतक ठोकून रोहितने संगकाराचा चार शतकांचा विक्रम मोडीत काढला आणि आपणच वर्ल्ड कपमधील ’बिग बॉस’ असल्याचे दाखवून दिले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यातील रोहितचे हे सलग तिसरे, तर यंदाच्या वर्ल्डकमधील त्याचे पाचवे शतक ठरले. श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराने 2015च्या विश्वचषकात सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला होता. रोहितचा जबरदस्त फॉर्म पाहता त्याला सलग पाच शतकांचा विक्रमही खुणावतोय. रोहित  शर्माने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 647 धावा केल्या आहेत. त्यामुळे सचिनचा सर्वाधिक 673 धावांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.

– रोहित शर्माचा विश्वविक्रम

एका वर्ल्डकपमध्ये सर्वात

जास्त शतक ठोकणारे खेळाडू

– रोहित शर्मा पाच शतके (2019*)

– कुमार संगकारा चार शतके (2015)

– मार्क वॉ तीन शतके (1996)

– सौरभ गांगुली तीन शतके (2003)

– मॅथ्यू हेडन तीन शतके (2007)

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply