Breaking News

भाजपतर्फे 21 जूनला योग शिबिरे

मुंबई ः प्रतिनिधी

जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यातील 2700पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यभरातील एक कोटींहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (दि. 18) दिली. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2700पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाणार आहे.

25 जून आणीबाणीविरोधी काळा दिवस 

स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ‘काळे पर्व’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. आणीबाणी काळात सरकारी यंत्रणेकडून झालेल्या अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण झाले होते. वृत्तपत्रांतील बातम्या, लेख यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली होती. या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी 25 जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार असून त्या दिवशी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्स, पत्रकार परिषद व समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणिवा समाजास करून देण्यात येतील, असे केशव उपाध्ये यांनी नमूद केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply