Breaking News

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कार्यान्वित करुन देशातील शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून शासनाने शेतकरी हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्वांर्थाने शेतकर्‍यांच्या आर्थिक परिवर्तनास चालना देणारी आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकर्‍याला दरवर्षी 6 हजार रुपये रक्कम 3 टप्यात मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अनिश्चित उत्पादनाच्या पार्श्वभूमिवर या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजेनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली आहे. देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची युध्दपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून या योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्तीश: लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जिल्हयात प्राधान्यक्रमाने अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना कालबध्द कार्यक्रम ठरवून दिला आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम, समितीची कार्ये व जबाबदारी निश्चित केली असुन या कामाचा जिल्हाधिकारी दौलत देसाई हे वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हयातील 100 टक्के पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होण्यासाठी सर्व यंत्रणा कटिबध्द झाल्या आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य आहेत.

तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहेत तर तहसिलदार समन्वय अधिकारी तथा तालुकास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच उपविभागीय कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे सदस्य आहेत. ग्रामस्तरीय समितीचे समिती प्रमुख तलाठी आहेत. तसेच ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक व वि.का.से.स.सो. चे सचिव हे सदस्य आहेत. या समितीने शेतकरी कुटुंबांची निश्चिती करायची आहे. यासाठी राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम व कृषि गणनेची माहिती प्राप्त करून घ्यावयाची आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही ज्या कुटूंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टर पर्यंत असेल त्यांना अनुज्ञेय आहे. या यादीमध्ये तलाठी यांनी त्या गावातील खातेदारांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण करावयाचे आहे. (कुटूंब म्हणजे पती-पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले). कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्यानंतर ज्या कुटूंबाचे सर्व विविध ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण धारण क्षेत्र 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबाची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याचे काम गतीने सुरु आहे. जिल्हयात परवापर्यंत 3 लाखाहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांची नोंदणी होऊन साडेसात हजारापेक्षा अधिक शेतकरी कुटुबांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली. उर्वरित पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम प्राधान्यक्रमाने जमा करण्याची प्रक्रिया गतीने सुरु आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत यादी तयार करताना खातेदाराच्या नावावर दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी असलेले धारण क्षेत्र विचारात घेण्यात आले आहे. या यादीमध्ये खातेदाराचे नाव लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक खऋडउ लेवश, आधार क्रमांक (आधारक्रमांक नसल्यास वाहन अनुज्ञप्ती, मतदार फोटो ओळखपत्र, नरेगा कुटूंब ओळखपत्र किंवा केंद्र, राज्य शासनाकडील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ओळखपत्र यापैकी एक) भ्रमणध्वनी क्रमांक हे संकलीत करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्हयातील पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यत हे काम पुर्ण करण्याच्यादृष्टीने सर्वच विभाग गतीमान झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जिल्हयातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना आधार देणारी आहे.

-एस. आर. माने, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply