Breaking News

खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्‍या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, महिला बालकल्याण समिती सभापती लीना गरड, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील व भाजपचे पदाधिकारी विजय पाटील, कीर्ती नवघरे, समीर कदम, दिलीप जाधव, मन्सूर पटेल, गुरुनाथ म्हात्रे, बिना गोगरी, साधना पवार, मोना अडवाणी व खारघर फोरमचे संस्थापक अर्जुन गरड उपस्थित होते.

या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिकेची पाण्याची पाइपलाइन, रिलायन्स गॅसची लाइन, व पेट्रोलियम कंपन्यांच्या लाईन सिडकोनिर्मित नाल्याच्या पातळीपेक्षा खाली करण्याच्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन सिडकोतर्फे दिले, तसेच यापुढे अतिवृष्टी झाल्यास एक टीम सतत त्या ठिकाणी तयार ठेवणार असल्याचे सांगितले. सोबतच खारघरमधील पाणी समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. खारघरला येणार्‍या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त 10 एमएलडी पाणी मिळवण्यासंदर्भात ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. काळे यांनी दिले, तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची तात्पूर्ती सोय करून पावसाळा संपल्यावर पूर्ण सर्फेस डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply