Breaking News

उरणमध्ये भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धा

उरण ः वार्ताहर

येथील मुनस्टार फुटबॉल क्लबच्या वतीने भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी

(दि. 21) स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचे उद्घाटन भाजप कार्यकर्ते जसिम गॅस यांच्या हस्ते झाले. या वेळी रेयोन तुंगेकर, सरजिल कादरी, अब्दुल शिलोत्री, हुसेन, जयेश, आमश, जितेश, तसेच फुटबॉलप्रेमी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी हुसेन पठाण, आमरा भिकन, गीतेश नागे, अकदस, आमिर शेख आदींचे सहकार्य मिळाले.

स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला. यात यजमान मुनस्टार क्लबसह जेएफसी, पागोटे, मोरा, कामठा, मसस्टोस, कोळीवाडा, वायएफसी, आरडी, एफसी, चाणजे, लियाकत एफसी व डीसीएफसी आदी संघांचा समावेश होता. विजेत्या संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply