पाली : प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशभरात त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाली सुधागड भाजपनेही जोरदार जल्लोष करीत या धाडसी निर्णयाचे स्वागत केले. भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, तालुका सरचिटणीस आलाप मेहता, निखिल शहा, दादा घोसाळकर, पाली शहर अध्यक्ष वा. सु. मराठे, गणपत सितापराव, अमोल कांबळे, अभिजित घाटवळ, दिनेश शहा, भाऊ मोहिते, राजेंद्र खिवसरा आदी या वेळी उपस्थित होते.
काश्मीरमधील 370 कलम रद्द करून मोदी सरकारने देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी कामगिरी केली आहे. या निर्णयाने प्रत्येक देशप्रेमी नागरिकाच्या मनात मोदी सरकारबाबत आदर, आपुलकी व अभिमानाची भावना अधिक वृद्धिंगत झाली आहे.
-राजेंद्र राऊत, अध्यक्ष, सुधागड तालुका भाजप