पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे बुधवारी वळवली येथील शाळेत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मधे, कृष्णा पाटील, सचिन चौधरी, कचेर चौधरी, हरिचंद्र पेटकर, दीपक पाटील, नारायण चौधरी, हरिचंद्र चौधरी, कमलाकर चिखलेकर, विश्वास भोईर, गजानन पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.