Breaking News

डबेवाल्यांना मेट्रो-मोनोतही प्रवेश देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

मेट्रो आणि मोनो रेल्वेतून डबेवाल्यांनाही प्रवास करू देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. मुंबईतील प्रवास वेगवान व सुरक्षित होण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे सुरू करण्यात आली आहे, मात्र या सेवांचा फायदा डबेवाल्यांना घेता येत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. मुंबईत सुरक्षित व वेगवान प्रवास होण्यासाठी व लोकलवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो रेल्वे यांची आवश्यकता आहे. या सेवा मुंबईत सुरू करताना परदेशातील स्थितीप्रमाणे त्याचे नियमन करण्यात आले. त्यामुळे ठरावीक वजन व लांबीच्या आकाराच्या सामानांसह मेट्रोतून प्रवास करता येतो. त्यामुळे डबेवाल्यांना मुंबईतील या वेगवान वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेता येत नसल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार असून मेट्रो, मोनोतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अथवा लोकलप्रमाणे लगेजचा एखादा डबा जोडण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचेही सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply