Breaking News

पेण पालिकेच्या वतीने शिक्षकांचा गौरव

पेण : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण नगर परिषद सभागृहात झालेल्या या शिक्षक गौरव समारंभाला पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वसंत आठवले, रोहा पं. स. माजी उपसभापती मारुती देवरे, पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती सुहास पाटील, शेहनाझ मुजावर, नलिनी पवार,  अश्विनी शहा, नगरसेविका वैशाली कडू, नगरसेवक प्रशांत ओक, मुख्याधिकारी अर्चना दिवे, प्रशासनाधिकारी बी. के. पाखरे, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अजय क्षीरसागर आदींसह शिक्षक उपस्थित होते. मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी प्रास्ताविकात शिक्षक गौरव समारंभाचा हेतू विषद केला. या वेळी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते मानसी महेश केळकर (पूर्व प्राथमिक विभाग), अनिता विजय पाटील, अनिता बाळासाहेब घोडके, अभिनय गोपाळ भोईर (सर्व प्राथमिक विभाग), राजेंद्र भालचंद्र साळवी (माध्यमिक विभाग) आणि सुनील दिनकर पवार (महाविद्यालयीन विभाग) या शिक्षकांचा प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply