नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात होऊन त्यांच्या पत्नी शर्मिला यांना मुका मार बसला, तर चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना शनिवारी (दि. 5) हा अपघात झाला.
नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक ऑटो रिक्षा अचानक शर्मिला ठाकरे यांच्या कारच्या समोर आली. तिला धडक बसू नये म्हणून चालकाने कारचा ब्रेक दाबला. त्याच वेळी मागून आलेल्या गाडीने शर्मिला यांच्या कारला धडक दिली. राज ठाकरे यांची कार त्या वेळी पुढे निघून गेली होती. अपघातग्रस्त कारमध्ये शर्मिला यांच्याबरोबरच राज यांची बहीण व सचिव सचिन मोरे होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस
घटनास्थळी धावले.