Breaking News

माथेरानमधील शाळांची घंटा वाजली

कर्जत : बातमीदार

कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या माथेरानमधील शाळा सोमवारपासून (दि. 11) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये असलेल्या खासगी आणि नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट वाढला आहे. माथेरान येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर मराठी माध्यमिक विद्यालय आणि सेंट झेव्हीयर इंग्लिश माध्यमिक या दोन शाळा सोमवारपासून नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सर्व वर्ग सॅनिटाइझ करून विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहे. फक्त नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच सातवी, आठवीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी सांगितले. हे वर्ग दररोज 10.40 ते 12.40 या दोन तासांत घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेचे संचालक शशीभूषण गव्हाणकर, नगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रतिभा घावरे, नगरसेवक संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांच्यासह शाळेचे शिक्षक उपस्थित होते. दहावीच्या 28 पैकी 14 विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत क्रॉस बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply