Breaking News

रविशेठ पाटील यांना प्रभागातून मताधिक्य देणार

नगरसेवक निवृत्ती पाटील यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) पेणचे नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांना प्रभाग क्र. 8मधून मताधिक्य देणार असल्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. गैरसमजुतीमधून नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता, मात्र तो स्वीकारला नव्हता. तसेच ते अन्य कोणत्याही पक्षात गेले नव्हते. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर निवृत्ती पाटील भाजपमध्ये पुन्हा सक्रिय झाले. त्यांचे रविशेठ पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या विजयात माझा खारीचा वाटा असेल, असे त्यांनी सांगितले. नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी त्यांच्या प्रभागात महायुतीला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे ठरविले असून, त्यामुळे  विरोधकांना चपराक बसणार असल्याचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply