अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 131 उमेदवारांपैकी 112 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र वैद्य ठरली आहेत, तर 19 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत.
188-पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून पाच उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत. 189-कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज 17 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून तीन उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत.
190-उरण विधानसभा मतदारसंघामध्ये 11 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून एका उमेदवाराचे नामनिर्देशपत्र अवैध ठरले आहे. 191-पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 18 उमेदवारांपैकी 16 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरले असून दोन उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत.
192-अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये 37 उमेदवारांपैकी 33 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून चार उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहे. 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आज 17 उमेदवारांपैकी 16 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून एका उमेदवाराचे नामनिर्देशपत्र अवैध ठरले आहे.
194-महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आज 13 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली असून तीन उमेदवारांची नामनिर्देशपत्रे अवैध ठरली आहेत.