Breaking News

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पेण पालिकेतर्फे विकासकामे

पेण : प्रतिनिधी

पेण नगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहोळा बुधवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री अनंत गीते व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या हस्ते व माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या सोहोळ्यास पेण नगराध्यक्षा प्रितम ललित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी,  मा. जि. प. विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, युवा नेते ललित पाटील, कामगार संघटना कोकण अध्यक्ष विनोद शहा, बांधकाम सभापती देवता साकोस्कर, पाणीपुरवठा सभापती नलिनी पवार, महिला व बालकल्याण सभापती शहेनाझ मुजावर, कर व शुल्क समिती सभापती सुहास पाटील, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती अश्विनी शहा, मुख्याधिकारी अर्चना दिवे तसेच सर्व सदस्य, सदस्या व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

या वेळी पेण न. प. स्टेडियममधील पेव्हेलियनचे उद्घाटन, रोहिदास नगर येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेशद्वार उद्घाटन, मुक्ताई नगर येथील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन, एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बाह्यविकास प्रकल्पांतर्गत पेण बाह्यवळण रस्ता टप्पा क्र. 2 या 18 मीटर रुंदीच्या रस्त्याचे भूमिपूजन व शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत पेण न. प.च्या नाट्यगृहाचे उर्वरित काम करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ, शासनाच्या 14व्या वित्त आयोगांतर्गत विश्वेश्वर क्षेपणभूमीवर भराव करून मैदान विकसित करण्याच्या कामाचे उद्घाटन, तसेच चिंचपाडा गावठाण येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर  पेण न. प. मंदिराजवळ सभा होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply