Breaking News

नेरळ पोलिसांची बेशिस्त नागरिकांवर धडक कारवाई

कर्जत : बातमीदार

लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त नागरिकांवर  नेरळ पोलिसांनी  ऑनलाइन पद्धतीने कारवाई केली आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंध घातले गेले आहेत. सध्या  जिल्हा बंदीचे आदेश जारी असून विनाकारण बाजारात व शहरात फिरणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तर क्षमतेपेक्षा कमी प्रवासी घेवून वाहन चालवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून विविध  प्रयत्न केले जात असताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. बाजारातदेखील गर्दी होत आहे. जिल्हा बंदी असतानाही अनेकजण विनाकारण गाड्या घेऊन नियमांची पायमल्ली करताना आढळून आले आहेत. रायगड जिल्ह्यातील  नेरळ पोलीस ठाणे हद्दीला लागून ठाणे जिल्हा आहे.  या ठिकाणी वाहनचालक विनापरवाना जिल्हा बंदीच्या आदेशाचे पालन करताना दिसत नसल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, जिल्हा बंदी व नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त नागरिकांवर पोलीस धडक कारवाई करीत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तानाजी नारनवर यांनी अनेक ठिकाणी पोलीस तैनात केले असून, कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसात नेरळ पोलिसांनी शेकडो वाहन चालकांवर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply