Friday , June 9 2023
Breaking News

महाड एसटी स्थानकाचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

महाड : प्रतिनिधी

गेली कित्येक वर्षे रखडलेल्या महाड बसस्थानकाच्या नूतन व आद्ययावत इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने वचनपूर्ती केली असून सहा कोटी खर्चाच्या या बसस्थानकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि 7)सकाळी 11 वाजता पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. भरत गोगावले, आ. प्रवीण दरेकर, नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के उपस्थित राहणार आहेत.

महाड बसस्थानक नुतनीकरणाच्या कामासाठी जागेचा कोणताही अडथळा नसून, या प्रकरणी संपादनाची प्रक्रिया ही स्वतः कलेक्टर यांनी केलेली असल्याने तशी कोणतीही अडचण नाही, मात्र महाड नगरपालिकेकडून बिल्डिंग परमिशन मिळाली म्हणजे भूमिपूजनाचा मुहूर्त टळणार नाही, असे विभागीय नियंत्रक  अनघा बारटक्के यांनी सांगितले.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply