Breaking News

जिल्हा प्रज्ञा प्रकोष्ठतर्फे उद्या बुद्धिजीवी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रज्ञा प्रकोष्ठ तर्फे बुधवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता खारघरमध्ये रायगड जिल्ह्यातील बुद्धिजीवींचे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार किरिट सोमय्या मार्गदर्शन करणार असून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. खारघरमधील सेक्टर 5 येथील सरस्वती इंजिनीअरिंग कॉलेज.(उत्सव चौकाजवळ) येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनास जिल्ह्यातील बुद्धीजिवींनी उपस्थित राहण्याचे आवाहन  तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,  खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व नगरसेवकांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply