Breaking News

सारडे विकास मंचच्या किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण

सारडे : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील सारडे विकास मंचच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किल्ले स्पर्धा घेण्यात आली. अतिशय सुंदर अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असे गडकिल्ले या चिमुरड्यांनी स्वतःच्या मेहनतीने बनविले आहेत. त्याचे श्रेय या मुलांनाच जाते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला अनुज केसरीनाथ पाटील, द्वितीय आयुष महेंद्र पाटील, तर उत्तेजनार्थ दीपेश अरुण कुळवे, प्रियाल नितीन म्हात्रे हे यशस्वी ठरले. त्यांना सुयश कलासेस आवरेतर्फे भेट देण्यात आली. या वेळी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, खजिनदार रोशन पाटील, संपेश पाटील, दिनेश म्हात्रे, रोहित पाटील, तेजस म्हात्रे, रिया म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे, जन्मेष म्हात्रे,  रा. ना. पाटील, सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड, गोल्डन ज्युबिलीचे सचिव अनिल घरत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नागेंद्र म्हात्रे यांनी केले, तर आभार अनिल घरत यांनी मानले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply