Breaking News

एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला; भाजपची मागणी

पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी भाजपने आधीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमच्या बंदीची मागणी केली. हिंदूंबाबत चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात शर्जिलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाईसाठी महापौर मुरलीधर मोहोळांसह भाजप पदाधिकार्‍यांनी आयुक्तांची भेटही घेतली. यापुढे एल्गारच्या आयोजनावर कायमची बंदी घालावी, तसेच परिषद झाल्यास ती उधळून लावण्याची भूमिका भाजप युवा मोर्चाने घेतली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply