नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून गुरुवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. या बालदिनानिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीने साकारले. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्यातून एक बेस्ट डुडल गुगलच्या होम पेजसाठी निवडले जाते. या वर्षीचे डुडल गुरुग्राम येथील दिव्यांशी सिंघलने साकारलेे. गुगलने घोषित केलेल्या या स्पर्धेत ‘व्हेन आय ग्रो अप्, आय होप…’ हा विषय डुडल बनवण्यासाठी देण्यात आला होता. सात वर्षांच्या दिव्यांशीने ‘वॉकिंग ट्री’ या संकल्पनेवर आधारित डुडल रेखाटले. डुडलमध्ये तिने झाडांना चालताना दाखविले. गंमत म्हणजे तिच्या चित्रात तिने झाडांना बूटही घातले आहेत. पुढच्या पिढीपर्यंत जंगलांचे व झाडांचे महत्त्व पोहोचावे हा त्या मागचा उद्देश होता. गेल्या 10 वर्षांपासून गुगलकडून या स्पर्धेच आयोजन केले जाते. अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात.