Breaking News

लाकडी, कापडी मखर बाजारात ; पर्यावरणपूरक साहित्याला मागणी

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शनिवार, रविवारी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर सजावट व विद्युत रोषणाईवर गणेशभक्त विशेष भर देत असतात. त्यात मखराला प्राधान्य दिले जाते. थर्माकोलचे अनेक प्रकारातील मखर यापूर्वी बाजारात मिळत असत. मात्र, गेल्या वर्षीपासून थर्माकोल मखरावर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी कापडी मखर अधिक प्रमाणात उपलब्ध होते. आता लाकडी प्लायवूड व त्यावर कापडी आवरण असलेले मखर आले आहेत. त्याचबरोबर लोखंडी स्टँड व त्यावर कापडी फुलांची सजावट असलेले मखरही आहेत. लाकडी मखर 1 हजार 900 रुपये ते 12 हजारांपर्यंत आहेत. गणेशभक्तांकडूनही या पर्यावरणपूरक मखरांना

मागणी आहे.

-कोल्हापूरच्या पुराचा फटका लाकडी व प्लायवूडचे सजावट केलेले मखर कोल्हापूर येथून बाजारात येत होते. यासाठीचे प्लायवूड हे गुजरातमधून तर कापडावर हातकाम हे कोल्हापूर येथे होत होते. आतापर्यंत शहरात 500 नग विक्री केले असून पूरस्थितीमुळे एक ट्रक माल तेथेच अडकून राहिला असल्याचे विक्रेता सूरज राजपुरोहित यांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply