Breaking News

जेएनपीटीमध्ये संविधान दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील आघाडीच्या कंटेनर पोर्टतर्फे मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेएनपीटीचे कर्मचारी आणि अधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे जेएनपीटीचे चेअरमन आएएस संजय सेठी यांनी जेएनपीटीच्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमोर वाचन केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला औपचारिक मान्यता दिली आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी देशाचा समृद्ध वारसा आणि संमिश्र संस्कृती जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी देशाचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून जेएनपीटी वर्षभर चर्चा कार्यक्रम, मेळावे आणि इतर कामांद्वारे नागरिकांची कर्तव्ये अधोरेखित करणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply