Breaking News

‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे

पाच भारतीयांचा समावेश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत आहे.

‘विस्डन’ने यासाठीच इंग्लंडव्यतिरिक्त इतर संघातील 11 खेळाडूंची निवड केली आहे. या संघाचे नेतृत्व भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. ‘विस्डन’ने इंग्लंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्यासाठी रेस्ट ऑफ वर्ल्ड इलेव्हनची निवड केली आहे. इंग्लंडमधील परिस्थितीचा अंदाज घेत या संघाची निवड करण्यात आली आहे. सध्याच्या प्रदर्शनानुसार यासाठी 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश असून त्याचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे.

दरम्यान, यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत, तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड या संघांतील एकाही खेळाडूला अंतिम 11मध्ये निवडण्यात आले नाही. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ 2019मध्ये झालेल्या विश्वचषकातील उपविजेता आहे.

‘विस्डन’ संघ ः रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), बाबर आजम, के. एल. राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, राशिद खान, मिशेल स्टार्क, शाहीन शाह, अफरीदी आणि जसप्रीत बुमराह.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply