पनवेल ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुका स्तरावर मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग (तक्ता बनवणे) आदी स्पर्धांचा यात समावेश होता. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर करून स्पर्धेस भरघोस प्रतिसाद दिला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पनवेल तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
-स्पर्धेचा निकाल :
पूर्व प्राथमिक विभाग :- वेशभूषा स्पर्धा
प्रथम – कु. दुर्वा हर्षल निचबाळकर (मोठा शिशू) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कळंबोली,
द्वितीय – कु. रूद्रा संदीप जाधव (मोठा शिशू) चांगू काना ठाकूर विद्यालय, न. पनवेल
तृतीय – कु. पूर्वा मनोज कांबळे (मोठा शिशू) चांगू काना ठाकूर विद्यालय, न. पनवेल
उत्तेजनार्थ – कु. आर्या शिवलिंग कोरे (मोठा शिशू) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, कळंबोली
प्राथमिक विभाग ः- चित्रकला स्पर्धा –
गट : इ. 1ली/2री…
प्रथम – कु. आराध्या भानुदास सुपेकर इ. पहिली, रा. जि. प. प्राथमिक शाळा, चिंचपाडा
द्वितीय – कु. स्वरा सचिन भिसे इ. दुसरी, चांगू काना ठाकूर विद्यालय, न. पनवेल
तृतीय – कु. आर्या समीर इंगळे इ. पहिली, रा. जि. प. प्राथमिक शाळा, न्हावेखाडी
उत्तेजनार्थ – चि. ओम ज्ञानेश्वर भोईर इ. पहिली, को. ए. सो. व्ही. के हायस्कूल, पनवेल
प्राथमिक विभाग ः- पोस्टर मेकिंग (तक्ता बनवणे) स्पर्धा ः गट-3री/4थी
प्रथम – चि. सर्वज्ञ साईनाथ कोटलवार इ. 4थी, चांगू काना ठाकूर विद्यालय, न. पनवेल
द्वितीय – कु. तनिष्का तुषार जाधव इ. 4थी, को. ए. सो. दत्तूशेठ पाटील प्राथमिक शाळा, पनवेल
तृतीय – कु. ध्रुती रूपेश ठाकूर इ. 4थी, रा. जि. प. प्राथमिक शाळा, न्हावेखाडी
उत्तेजनार्थ – कु. खुशी नानासाहेब मरकड इ. 3री, चांगू काना ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल.