Breaking News

पनवेलमध्ये व्यापार्याची आत्महत्या

पनवेल : बातमीदार

शहरातील कापड बाजारजवळील झवेरी बाजारात प्रगती ज्वेलर्सच्या नावाने दुकान थाटून आपला व्यवसाय करणार्‍या व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.30च्या सुमारास घडली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, याबाबत आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही, मात्र कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा या वेळी परिसरातील नागरिकांमधून होत होती. प्रगती ज्वेलर्सचे मालक नितेश परमार यांनी मंगळवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील कनक सॉलिटेअर येथील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार हे आपल्या साथीदारांसह घटनास्थळी गेले असता सदर आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली असावी हे निष्पन्न झाले नाही. या वेळी कौटुंबिक कारण असल्याची बाब समोर आणली गेली. याबाबत रात्री उशिरा पनवेल शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. बुधवारी नितेश परमार यांच्यावर सकाळी 10 वाजता तक्का येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नितेश परमार यांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असले, तरी येथील रहिवाशांमध्ये त्यांच्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असण्याची चर्चा जोर धरू लागली होती. याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश नंदकुमार पवार हे करीत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply