पनवेल : वार्ताहर
कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा विभाग भाजपकडून परिसरात मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात तसेच लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाने आता शहरी भागासहीत ग्रामीण भागातदेखील प्रादुर्भाव वाढवला आहे. ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत कोरोनासंदर्भात जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर व्हावा, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचा आणि नागरिकांची सुरक्षितता करण्याचा उद्देश समोर ठेवून कर्नाळा भाजपच्या वतीने मोहीम सुरू झाली आहे. तारा गाव, एनएच 17 या मार्गावरील कर्नाळा टोल चौंकी (साई बीट)वर कार्यरत असणारे पोलीस वर्ग, बांधनवाडी गाव युसुफ मेहरअली सेंटर (दवाखाना), तसेच खैराटवाडी या विभगात छ95 मास्क आणि सॅनिटायझर मोफत वाटप करण्यात आले. या वेळी तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र सुरेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश विठ्ठल पाटील, बूथ उपाध्यक्ष हरेश्र्वर लक्षण पाटील, केळवणे युवा मोर्चा अध्यक्ष रोशन मधुकर पाटील, केळवणे पंचायत समिती उपाध्यक्ष दीपक पाटील, हर्षल तेजे, मोहन पांडुरंग पाटील, शशिकांत अनंत पाटील, तसेच तारा गाव भाजप कार्यकर्ते महादेव ठाकूर, प्रमोद पाटील, राजेंद्र म्हात्रे, रामकृष्ण पाटील, हेमंत पाटील, अमित पाटील, वीरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला ऋशिकेश निळकंठ पाटील (वरचे ओवले) यांचे मोलाचे योगदान लाभले.