Breaking News

जामिया हिंसाचार; अटकेतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामियानगर परिसरात झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश नाही. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 10पैकी तीन जण हे परिसरातील ‘बॅड कॅरेक्टर’ घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात रविवारी (दि. 15) आंदोलन करताना न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत काही समाजकंटकांनी उच्छाद मांडला. या आंदोलनादरम्यान तीन बसेस आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली. इतकेच नव्हे तर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चारपैकी एक गाडीही पूर्णत: नष्ट केली. सोबतच इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात पोलीस दलातील 10 आणि अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीही जखमी झाले होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply