Breaking News

पक्षवाढीसाठी मेहनत घ्या : अश्विनी पाटील; भाजप महिला मोर्चा पनवेल ग्रामीण मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप महिला मोर्चाच्या पनवेल ग्रामीण मंडलची कार्यकारिणी बैठक सोमवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना पाटील यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घ्या, असे आवाहन केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा अरुण घरत, सरचिटणीस लीना पांडुरंग पाटील, प्रतिभा सुभाष भोईर, उपाध्यक्ष समिना महंमद साठी, रेखा दिनेश म्हात्रे, योगिता सुहास भगत, अनसूया तुळशीदास घरत, सचिव शिल्पा रवींद्र म्हात्रे, स्नेहलता हिरालाल ठाकूर, मनीषा रवींद्र घरत, कल्पना अरुण ठाकूर, नीता अनिल चोणकर, इंदुमती गणेश पाटील, जयश्री अशोक कोळी, नंदा राम ठाकूर, इंदुताई नारायण म्हात्रे आणि कोषाध्यक्ष ज्योती मंगेश भोपी यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या बैठकीला पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी, महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, सरचिटणीस मृणाल खेडेकर, सोशल मीडिया संयोजक गायत्री परांजपे, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री म्हसकर, सावित्रीबाई पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपल्या भाषणात महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील म्हणाल्या की, आज ज्यांची ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. ही जबाबदारी आहे पक्षसंघटना मजबूत करण्याची. आपल्याला लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व लाभले ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी प्रयत्न करा. तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांचे हात बळकट करा. त्याचबरोबर जनतेचे प्रश्न सोडवा.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिनंदनाचा ठराव

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना नुकतेच दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल महिला मोर्चाच्या बैठकीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply